मुंबई

घोडबंदरवरील अपघाताचे हॉटस्पॉट सुरक्षित

CD

घोडबंदर मार्गावरील अपघाताचे हॉटस्पॉट सुरक्षित
वाहतूक विभागाकडून बदल; चार महिन्यांत एकाही अपघाताची नोंद नाही

ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) : अपघाताचा मार्ग म्हणून घोडबंदर महामार्गाकडे पाहिले जाते, परंतु आता घोडबंदर महामार्गाची ही ओळख पुसवण्याचे काम ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. या मार्गावरील अपघात घडण्याच्या ठिकाणी पोलिसांनी बदल केले आहेत. तेव्हापासून येथे एकही अपघात झालेला नाही.

जेएनपीटी बंदरामधून रोज हजारोंच्या संख्येने जड अवजड वाहनांची घोडबंदर महामार्गावरून वाहतूक होते. दिवसा वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतुकीची परवानगी दिली आहे. काही ठिकाणी विशेषतः पातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा या पुलांवरील चढणीची ठिकाणे अवजड वाहनांच्या अपघातासाठी हॉटस्पॉट ठरली होती. या ठिकाणी विजेची सुविधा नसल्याने चालकांना अंधारात हा भाग दिसून येत नव्हता. त्यामुळे अधूनमधून सतत येथे अवजड वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.

अपघातामुळे दुसऱ्या दिवशी हे अवजड वाहन बाजूला करेपर्यंत मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे, मात्र आता या संकटातून घोडबंदर मार्गावरील चालकांची सुटका झाली आहे. अपघाताची मालिका लक्षात घेता ठाणे वाहतूक विभागाने या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पुरेशी लाइट लावण्याची व्यवस्था केली आहे. चढणीच्या काही अंतरावर स्प्रिंकल, रिफ्लेक्टर टॅप बसवले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भिंत वाढवून घेण्यात आली आहे. त्यामुळे ही यंत्रणा बसवल्यापासून मागील चार महिन्यांत या ठिकाणी एकही अपघात झाला नाही. यासोबतच पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांवर चढणीच्या ठिकाणी प्लॅस्टिक स्प्रिंग बोलार्ड बसवले आहेत. त्यामुळे या मार्गावर पुलाच्या चढणीच्या ठिकाणांवर होणारे अपघातही बंद झाले आहे.

वाहतूक विभागाचा उपायुक्तपदाचा पदभार घेताच घोडबंदरवरील अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी केली. त्यात वाघबीळ, पातलीपाडा आणि मानपाडा या तीन पुलांच्या चढणीच्या ठिकाणी अवजड वाहने पलटी होण्याचे अपघात वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. येथील अपघात बंद व्हावेत, यासाठी येथील जागा आणि अपघाताचे निरीक्षण केले. त्यानंतर येथे आवश्यक असलेल्या साधनांची पूर्तता केली. तेव्हापासून या ठिकाणी एकही अपघात झाला नाही.
- पंकज शिरसाट, उपायुक्त वाहतूक विभाग, ठाणे शहर

२०२४ मध्ये झालेले मोठे अपघात :
२३ जानेवारी २०२४, ठिकाण - पातलीपाडा ब्रिजवर लोडेड ट्रक पलटी
१५ एप्रिल, ठिकाण - वाघबीळ पूल उतरणीवर टेम्पो पलटी
३ जून, ठिकाण - मानपाडा पूल चढणीवर कार पलटी
१९ जुलै, ठिकाण - पातलीपाडा पूल चढणीवर लोडेड ट्रक पलटी
२९ जुलै, ठिकाण - वाघबीळ पूल चढणीवर लोडेड ट्रक पलटी
२ ऑगस्ट, ठिकाण - पातलीपाडा पूल चढणीवर लोडेड ट्रक पलटी
३ सप्टेंबर, ठिकाण - पाटलीपाडा पूल चढणीवर कलरने भरलेला लोडेड ट्रक पलटी
६ सप्टेंबर, ठिकाण - मानपाडा पूल चढणीवर लोडेड ट्रक पलटी
४ सप्टेंबर, ठिकाण - पातलीपाडा पूल चढणीवर लोटेड केमिकल ट्रक पलटी
६ सप्टेंबर, ठिकाण - मानपाडा पूल चढणीवर दुभाजकावर बस चढली.
७ सप्टेंबर, ठिकाण - वाघबीळ पूल चढणीवर लोडेड मिक्सर पलटी
१६ सप्टेंबर, ठिकाण - वाघबीळ पूल चढणीवर कार पलटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT