मुंबई

घणसोलीत संत तुकाराम महाराज पादुका सोहळा

CD

वाशी, ता. ७ (वार्ताहर) : जगद्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त नवी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आगमन नवी मुंबईत होणार असून, घणसोली सेक्टर नऊ येथे पालखी सोहळ्याच्या माध्यमातून पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचसोबत गुरू-माता-पिता कृतज्ञता सोहळ्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानदीप ट्रस्ट, श्री कृतज्ञता ट्रस्ट, सद्‍गुरु ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव सामाजिक सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना संत तुकाराम महाराजांच्या नूतन पादुकांचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हभप महर्षी राहुल महाराज ताम्हाणे आणि हभप भागवताचार्य दिनेश महाराज औटी यांनी सांगितले आहे. या सोहळ्याचे नियोजन सर्वेश झोडगे, सोमनाथ शिरसाट, हरिदास जायभाये, बाळशिराम गवांदे, सागर गवांदे, भाऊसाहेब आरोटे, सागर आरोटे, संकेत करंडे यांच्यासह समस्त वारकरी संप्रदायाने केले आहे.
--------------
मान्यवरांचा सन्मान
सोहळ्याच्या निमित्ताने संतोष ताम्हाणे, देवांश शरद नाईक, ममीत चौगुले आणि गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना कृतज्ञता समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षकरत्न पुरस्कार देऊन शिक्षकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT