बदलापूर स्वतंत्र महानगरपालिका होणारच!
आमदार कथोरे यांंचे विरोधकांना खडे बोल
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : जनतेच्या मनात काय आहे, तसेच जनतेच्या हितासाठी काय महत्त्वाचे आहे ते आम्ही ओळखून आहोत. त्यामुळे कुणी काहीही म्हटले तरी बदलापूर ही स्वतंत्र महानगरपालिका होणारच, असे म्हणत अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महापालिकेसाठी भाष्य करणाऱ्या आणि स्वतंत्र बदलापूर महापालिकेला विरोध करणाऱ्यांना आमदार कथोरे यांनी चांगलेच खडसावले आहे.
स्वतंत्र बदलापूर महापालिका व्हावी, यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहोत. जर खऱ्या अर्थाने बदलापूर शहराचा आणि त्यासोबत आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल, तर स्वतंत्र बदलापूर महापालिका होणे आवश्यक आहे, कारण अंबरनाथ हे बदलापूरसारखे एक मोठे आणि झपाट्याने विकसित होणारे शहर आहे; मात्र अंबरनाथ शहरातील वाढती गुन्हेगारी आणि राजकीय वातारणातील अस्थिरतेमुळे भविष्यात अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिका झाल्यास अंबरनाथच्या तुलनेत बदलापूरचा हवा तसा विकास होणार नाही. किंबहुना ही दोन्ही शहरांची एकत्रित महानगरपालिका झाल्यास शहरांच्या आजूबाजूचा ग्रामीण भाग दुर्लक्षितच राहील. त्यामुळे भविष्यातील या सगळ्या बाबी लक्षात घेता दोन्ही शहरातील वैचारिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात असलेली भिन्नता लक्षात घेता बदलापूर ही स्वतंत्र महानगरपालिका व्हावी, यासाठी आम्ही अनेकदा प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा केल्या आहेत. या चर्चेतून बदलापूर ही स्वतंत्र महापालिका होईल, अशी आमची खात्री आहे, असे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी माजी खासदार कपिल पाटील व माजी नगराध्यक्षांनी अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिका होणार, असे म्हटले होते. तर स्वतंत्र महापालिकेबाबत कपिल पाटील यांनी कधीच आग्रही भूमिका घेतली नाही. काही दिवसांपूर्वी पत्रकारांना देत असलेल्या माहितीत त्यांनी अंबरनाथ-बदलापूर एकत्रित महानगरपालिका होईल, असे संकेत दिले; मात्र त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत आमदार किसन कथोरे यांनी कोणी कितीही काहीही म्हटले तरी बदलापूर ही स्वतंत्र महापालिकाच होणार, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.