मुंबई

सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर लक्ष

CD

सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर लक्ष
स्वच्छतेवर सनियंत्रणासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : महापलिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यावर पालिकेने विशेष भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या शौचालयांची दिवसातून दोनदा स्वच्छता केली जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात ही स्वच्छता केली जाते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्ग ठाणे शहरातील विविध कामे हाती घेतली होती. त्यानुसार ठाणे शहरातील झोपडपट्टी भागातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यासह ते स्वच्छ ठेवल्यास रोगराईसह त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. या दृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने सार्वजनिक शौचालयांची दिवसातून दोनदा सफाई करण्याचा निर्णय घेतला.

ठाणे महापालिका हद्दीत ९४५ शौचालये आहेत. त्या ठिकाणी सुमारे १० हजार ७७० हजार सीट्स आहेत; मात्र मागील काही वर्षांत या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झालेली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने महापालिकेला ७३ कोटी दिले होते. त्यानुसार ७०० शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतली आहेत. तसेच ही शौचालये चांगली राहावीत, स्वच्छ, नीटनेटकी राहावीत यासाठीदेखील पालिकेच्या घनकचरा विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. त्यातही या शौचालयांची सफाई योग्य न झाल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या शौचालयांच्या सफाईसाठी ॲसिड, फिनेलचा वापर करून साफसफाई करणे गरजचे आहे. परंतु योग्य पद्धतीने स्वच्छता किंवा साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी पालिकेच्या संबंधित विभागाला वारंवार प्राप्त होत आहेत.

अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय होऊन रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता शौचालय स्वच्छतेची सद्य:स्थितीबद्दल नियमित अहवालासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. त्यानुसार हे सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी २५ लाखांच्या आसपास खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर झाला आहे.

असे असणार सॉफ्टवेअर
सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने शौचालय स्वच्छतेच्या सद्य:स्थितीबाबत दैनंदिन अहवाल उपलब्ध करून घेता येणार आहे. मोबाइल गॅलरीमधील जुन्या फोटांचा वापर प्रतिबंध करून सद्य:स्थितीतील फोटो अपलोड करणे आवश्यक राहणार आहे. प्रत्येक शौचालय प्रवेशद्वारावर दोन बाय दोन इंच आकाराचे क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना शौचालयाच्या सद्य:स्थितीचे सर्वसमावेशक फोटो दाखविण्यासाठी एकापेक्षा अधिक फोटो सबमीट करता येणार आहेत. तसेच या अ‍ॅपमधील कॅमेरा वापरून फोटो कॅप्चर करू शकत असल्याने मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमुळे केवळ त्याच कार्यक्षेत्रातील माहिती मिळू शकणार आहे. स्वच्छता अहवालासाठी क्यूआर कोड स्कॅन न झाल्यास शौचालयाची साफसफाई न झाल्याचे त्यानुसार समजण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT