मुंबई

अखेर मृत्यूचे खांब हटणार

CD

अखेर मृत्यूचे खांब हटवणार
एमएमआरडीकडून कामाला सुरुवात : महावितरणचा खुलासा
सकाळ इम्पॅक्ट
सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : कल्याण-बदलापूर महामार्गावरील मृत्यूला आमंत्रण देणारे विजेचे काम अखेर हटणार आहेत. एमएमआरडीएने या कामासाठी नऊ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे महावितरण आणि एमएमआरडीए यांच्या वादात रखडलेल्या विजेच्या खांबांचे स्थलांतर लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण-बदलापूर महामार्गाच्या मधोमध असणारे विजेचे खांब मृत्यूस कारण ठरत होते. या विजेच्या खांबांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली होती. २०१५ ते २०२४ या मागील नऊ वर्षांच्या काळात एकूण ७९ जणांनी आपले प्राण गमावले होते. अपघातांचे वाढते प्रमाण आणि मृत्यूची संख्या पाहता हे विजेचे खांब हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसारित केले होते. ‘सकाळ’च्या या वृत्तानंतर एमएमआरडीएने हे विजेचे खांब स्थलांतरित करण्याच्या कामाला तात्काळ सुरुवात केली आहे. दरम्यान, यावर महावितरणने आपले हात झटकले आहेत. महावितरणने प्रसिद्धी पत्रक काढत महामार्गावरील विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी एमएमआरडीची असून, महावितरणकडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

महावितरणने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर महामार्गावरील विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आहे. महामार्गाचे रुंदीकरण करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने दिलेला प्रस्ताव १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजूर करून महावितरणने मार्च २०२० मध्येच एमएमआरडीएला दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान, अपघात टाळण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या खांबांना रेडियमच्या पट्ट्या लावल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर महामार्गाचे रुंदीकरण करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्याबाबत एमएमआरडीएने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला महावितरणने मार्च आणि ऑगस्ट २०२०मध्ये १.३ टक्के डीडीएफ योजनेतून मंजुरी दिली. त्यानुसार रुंदीकरण करताना विजेचे खांब स्थलांतरित करण्याचे काम एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्यावर आहे. महावितरणची जबाबदारी केवळ संबंधित कामावर देखरेख ठेवण्यापर्यंत मर्यादित आहे. पहिल्या टप्प्यातील वाहिन्या भूमिगत करण्याचे काम जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाले. उर्वरित कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी महावितरणने एमएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार एमएमआरडीएने देखरेख शुल्काचा भरणा करून मे. टॉप इलेक्ट्रिकल या कंत्राटदाराकडे काम सोपवले आहे. एमएमआरडीए, महावितरण आणि कंत्राटदाराकडून संयुक्त पाहणी करून कामाला सुरुवात केली आहे.

दीडशे विजेचे खांब
रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी तूर्तास अडथळा ठरणाऱ्या खांबांना रेडियमच्या पट्ट्या लावल्या आहेत. खांब स्थलांतरित करण्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महावितरण एमएमआरडीएच्या कंत्राटदारास संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. कल्याण-बदलापूर महामार्गावर साधारणपणे दीडशे विजेचे खांब आहेत. या खांबांचे स्थलांतर करण्यासाठी नऊ कोटी १४ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, सोमवारी (ता. ६) कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल. तसेच हे काम विमको नाका जिथे पहिला अपघात झाला तिथून सुरू केल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Pune: तरुणीला पाहत भररस्त्यात हस्थमैथून, तरुणाचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद; संतापजनक प्रकाराने पुण्यात खळबळ

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी सीबीआय न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT