मुंबई

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे आज लोकार्पण

CD

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे आज लोकार्पण
नूतनीकरणामुळे वास्तूला नवी झळाळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय वास्तूचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. नूतनीकरणामुळे या वास्तूला नवीन झळाळी मिळाली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आवारात हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
१९२ वर्षांचा इतिहास असणाऱ्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या वास्तूचे नूतनीकरणाचे काम मुंबई पालिकेने मार्च २०२३ मध्ये हाती घेतले होते. नियोजनाप्रमाणे ही कामे १८ महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य प्लास्टर दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोते क्षेत्राचे संरक्षण, रंगकाम, कठडे, रॅम्प इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नूतनीकरण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी कामकाज पाहिले.
मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला इतिहास उलगडून दाखवणारे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय आहे. लंडनमध्ये सन १८५१ मध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतील संग्रहालयाची संकल्पना उदयास आली. त्यानंतर सन १८५५ मध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावाने या संग्रहालयाची स्थापना झाली. सन १८५७ मध्ये टाऊन बराक येथे संग्रहालय जनतेसाठी प्रत्यक्षात खुले झाले. या इमारतीची पायाभरणी १९ नोव्हेंबर १८६२ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रेअर यांच्या हस्ते झाली. १८७२ पासून या इमारतीत संग्रहालयाचा प्रारंभ झाला. संग्रहालय स्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या सन्मानार्थ १ नोव्हेंबर १९७५ रोजी ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले.

संग्रहालयातील अनमोल ठेवा
या संग्रहालयात विज्ञान, कला व अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघुशिल्पे, नकाशे, पाषाणावरून केलेली मुद्रांकने, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके इत्यादी त्यातील विशेष आकर्षणे आहेत. सहा विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली आहे. मुंबईचा इतिहास, औद्योगिक, कला, १९ व्या शतकातील चित्रे, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेमध्ये समावेश आहे. संग्रहालयाला २००५ मध्ये युनेस्कोचा सांस्कृतिक संवर्धन पुरस्कार मिळाला. मुंबईचा इतिहास, कला, सांस्कृतिक विकास इत्यादी विषयांवर संग्रहालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नाट्य, कार्यशाळा, चित्रपट, संगीत आणि चर्चासत्रांचा समावेश असतो. भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात विनामूल्य प्रवेश दिला जातो. संग्रहालयाच्या मुख्य इमारतीतील कमलनयन बजाज विशेष कला दालनात प्रदर्शने भरवण्यात येतात.

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT