मुंबई

पित्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

CD

पित्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग


सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : वडिलांनीच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पीडितेने याला विरोध करताच आरोपीने रागाच्या भरात मुलीची शाळेची पुस्तके, कपडे जाळून टाकली. हा प्रकार पीडितेने आपल्या आईला सांगताच तिने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार रविवारी (ता. ५) सायंकाळी घरात अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत वडिलांनी तिचा विनयभंग केला. तिने विरोध करताच वडिलांनी गोंधळ घातला. पीडित मुलीची आई घरी येताच मुलीने आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आईने याचा जाब विचारताच दोघांमध्ये भांडण झाले. या वादात भडकलेल्या वडिलांनी पत्नीला व मुलीला मारहाण केली. तसेच मुलीची शाळेची पुस्तके, कपडे कपाटातून काढून जाळून टाकली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल करताच पोलिसांनी ५० वर्षीय आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT