‘इंडियन मर्चंट चेंबर’तर्फे गुरुवारपासून अनंत प्रदर्शन
मुंबई, ता. ७ : आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या यंग लीडर्स फोरमतर्फे ९ व १० जानेवारी रोजी अनंत हे पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन आणि परिषद आयोजित करण्यात आली आहे. नेहरू सभागृहातील नेहरू प्रदर्शन केंद्रात याचे आयोजन होईल.
पर्यावरणपूरक जीवनशैली, पर्यावरणस्नेही राहणीमान यांना प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा व प्रदर्शनाचा हेतू आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, तसेच केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय यांचा या प्रदर्शनाला पाठिंबा आहे.
कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे, प्रशासन, तसेच कामकाजात पर्यावरणपूरक पद्धतींचा अंगीकार करणे या विषयांवर येथे परिसंवादही होणार आहेत. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय मारीवाल, तसेच पी, वेलरासू, श्रीकांत पाणिग्रही, आयएमसी चेंबरच्या उपाध्यक्ष सुनीता रामनाथकर, प्रमुख उद्योजक आदी मान्यवर या वेळी हजर असतील.
या दोनदिवसीय प्रदर्शनात पर्यावरणपूरक उत्पादने, दागिने, वस्त्र प्रावरणे, सेंद्रिय पदार्थ, फॅशनशी संबंधित वस्तू आदी वीस प्रकारच्या गटवारी असतील. यात उद्योग, तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्यशाळादेखील होतील.
या उद्योगांनी या क्षेत्रात केलेल्या पर्यावरणपूरक कामाची माहितीही तिथे दिली जाईल. यात देशी व आंतरराष्ट्रीय कंपन्या, सल्लागार संस्था, सरकारी अधिकारी, विविध संस्था, उद्योग संघटना आदी सहभागी होतील, अशी माहिती आयएमसी चेंबरचे महासंचालक अजित मंगरूळकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.