मुंबई

वाहतूक नियमांना बगल

CD

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ७ : प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी वाहतूक वाहनांचे नियम पाळा, अशा सूचना वाहनचालकांना पोलिसांकडून वारंवार केल्या जातात, मात्र अनेकजण अद्यापही नियमांचे उल्लंघन करण्यात धन्यता मानतात. गेल्या कॅलेंडर वर्षात वसई-विरार, मिरा-भाईंदर शहरात ५७ हजार २४३ वाहनचालकांनी नियमांना बगल दिली. त्यामुळे वर्षभरात एकूण चार कोटी ८७ हजाराचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे.

वसई-विरार शहर आणि मिरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने आहेत. त्यातच अवजड वाहनांचादेखील समावेश आहे. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी खासगी वाहतूकदार सेवा देतात, तर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहने धावत असतात. यातील अनेक वाहने नियमांचे पालन करत नाहीत. दुचाकीवर हेम्लेट न वापरणे, सीटबेल्ट न वापरता मार्गावर वाहने नेत असतात, तसेच सिग्नलचा वापर करत नाहीत, याचबरोबर दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहने चालवणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, विनापरवाना गाडी चालवणे, कागदपत्रांचा अभाव यासह अनेक नियम मोडले जात असतात. वाहन चालवताना मद्यप्राशन केलेले चालकदेखील वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. वर्षभरात नाकाबंदी, वाहनांची तपासणी असताना वाहतूक पोलिस, शहरी पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या अशा वाहनचालकांवर थेट कारवाई केली आहे. त्यांना दंड आकारला आहे.

प्रशासनाकडून जागृती
पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपघात टाळणे, सुरक्षित वाहन चालवणे यासह अन्य नियमांची माहिती देण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताह, तसेच अन्य वेळी शिबिर आयोजित केले जाते. विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सोबत घेऊन रॅलीतून प्रबोधन केले जाते, मात्र तरीही काही वाहनचालक याकडे लक्ष देत नाहीत.

रिक्षांवर सर्वाधिक कारवाई
वसई-विरार आणि मिरा-भाईंदर शहरात मोठ्या संख्येने अवैध रिक्षांचे प्रमाण आहे. वर्षभरात नियम मोडणाऱ्या एकूण १३ हजार ८१७ रिक्षांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. वर्षभरात सर्वाधिक कारवाई रिक्षांवर झाली असल्याचे दिसून येत आहे.

रस्ते नादुरुस्त, सिग्नलमध्ये बिघाड
एकीकडे रस्त्यांची दुरवस्था असल्याने वाहन चालवताना अडचणीचे ठरत असते. वारंवार सिग्नलमध्ये बिघाड होत असतो. त्यामुळे वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे या बाबींवरदेखील प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे.

वाहतूक नियमांचे पालन करा
वाहन चालवताना नागरिकांचा प्रवास हा सुरक्षित असावा, यासाठी नियम आखण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वर्षभरातील आढावा
नियमभंग कारवाई
विनाहेल्मेट १,७५२
रिक्षाचालक १३,८१७
मद्यपान १४३
धोकादायक वाहन चालवणे १६,३८७
विना व अवैध परवाना परवाना ५६,०४५
अन्य कारवाई २४,५३९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT