मुंबई, ता. ७ : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते; परंतु अनेकदा वाहतूक पोलिस तडजोड करीत दंडाशिवाय रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात. असाच एक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या एक्स अकाउंटवर व्हायरल झाला असून, संबंधित लोकेशन शेअर करण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे. पण कोणताही माहिती अकाउंटवरून शेअर करण्यात आली नसल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एका झोमॅटोवाल्याच्या गाडीचा फोटो वाहतूक पोलिसाने काढला. हा फोटो काढल्यानंतर काही अंतरावर दुचाकीस्वाराने दुचाकी उभी केली तसेच खिशातून पैसे काढत वाहतूक पोलिसांकडे गेला. त्यानंतर वाहतूक पोलिसाने पैसे खिशात घातले, तर दुचाकीचालक निघून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंबईतील कोणत्या भागातील हा व्हिडीओ आहे, याबाबतची माहिती अद्याप उघड झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याची शहानिशा केली जात आहे. तसेच व्हिडिओ शेअर करणाऱ्याला संबंधित ठिकाणची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.