फ्युचर्स स्टफिंग सोल्युशन कंपनीतील कामगारांना पगारवाढ
उरण, ता. ७ (वार्ताहर) ः जीटीआय पोर्टमधील फ्युचर्स स्टफिंग सोल्युशन या कंत्राटाअंतर्गत मेंटेनन्स व ऑपरेटर्स म्हणून काम करणाऱ्या कामगारांना पाच हजार रुपये पगारवाढ देण्याचा करारनामा करण्यात आला आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून पगारवाढीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
मागील कित्येक वर्षांपासून कामगारांना पगारवाढ व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी न्यू मेरिटाइम जनरल कामगार संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. २०२४ मध्ये या कंपनीतील १५ कामगारांना पगारवाढ करण्यात आली होती. आता वर्षाच्या सुरुवातीलाच कामगारांना किमान वेतनासह पाच हजार रुपये पगारवाढ, बोनस ८.३३ टक्के, वॉशिंग अलाऊन्स, रजा, तसेच महागाई भत्ता (व्हीडीए) देण्याचे कंपनीकडून मान्य करण्यात आले आहे. दरवर्षी कामगारांसाठी १६ ते २० टक्के पगारवाढीचा करार करणारी न्यू मेरिटाइम जनरल कामगार ही एकमेव संघटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारनामाप्रसंगी न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, संघटक अजित ठाकूर, आनंद ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, तर कंपनी व्यवस्थापनातर्फे हृदयनाथ कांबळे (मॅनेजर), कामगार प्रतिनिधी दिनेश भोईर, पंढरीनाथ म्हात्रे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. पगारवाढीच्या करारनामामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.