जिल्हा प्रशासनाविरोधात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची नाराजी
उरण (बातमीदार) ः उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसन करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या लोकसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रालय सचिव, जिल्हाधिकारी, कोकण भवन, कोकण आयुक्त, पोलिस आयुक्त नवी मुंबई, प्रांत कार्यालय, तहसीलदार, न्हावा शेवा पोलिस स्टेशन, उरण पोलिस स्टेशन, मोरा पोलिस स्टेशन यांच्यासोबत याबाबत पत्रव्यवहारसुद्धा करण्यात आला आहे. शासनाने एनएसपीटी प्रकल्प विस्थापित हनुमान कोळीवाडा (शेवा कोळीवाडा) गावातील शेतकरी व बिगर शेतकरी असणाऱ्या २५६ कुटुंबांसाठी उरण येथील बोरीपाखाडी येथील १७.२८ हेक्टर जमिनीवर १२ नोव्हेंबर १९८२ ते १२ मार्च १९८७ मध्ये शासनाच्या मापदंडाने कागदोपत्री पुनर्वसन मंजूर केले होते. हे पुनर्वसन जिल्हाधिकारी यांनी आजतागायत केलेले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या लोकसेवकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यता आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.