सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः कोस्टल रोड प्रकल्पात दिरंगाई आणि निकृष्ट कामावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
पालिका निवडणुकीचे व्हीजन मांडताना आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या दिरंगाईवरून राज्य सरकारवर टीका केली. २०१७ मध्ये आम्ही कोस्टल रोडचे भूमिपूजन केले. दर महिन्याला या प्रकल्पाचा आढावा घेत होतो. २०२३ मध्ये आम्ही कोस्टल रोड पूर्ण करणार होतो, परंतु आमचे सरकार पडले. नवे सरकार आले. सी लिंकला जोडणारा रस्ता अजून पूर्ण झालेला नाही. टनेलमध्ये गळती लागली आहे. भ्रष्ट सरकारमुळे हा प्रकार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. या वेळी राणीच्या बागेत पेंग्विन म्हणून माझ्यावर टीका होते. आम्ही पेंग्विन दाखवतो, तुम्ही भारतात आणलेले चित्ते दाखवा, असा सवाल करीत त्यांनी भाजप सरकारला टोला लगावला.
--------------------
मराठीसोबत अन्य भाषापण शिका
मराठी आलीच पाहिजे. त्यासोबत किमान तीन ते चार भाषा शिका. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मी आणि आजोबा एकमेकांना डिक्शनरी भेट देत होतो. फ्रेंच भाषा शिकायला त्यांनी मला प्रोत्साहन दिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
------------------------------------------
निधीअभावी बेस्ट वाऱ्यावर
बेस्ट बसने दररोज ३० ते ३४ लाख लोक प्रवास करतात. बेस्टला पालिकेने निधी दिला पाहिजे. पालिका आणि एमएमआरडीएला साडेपाच हजार कोटी देते, पण बेस्टला काहीही निधी देत नाही. बेस्ट वाऱ्यावर सोडली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
----------------------------------------
फडणवीस यांना सतत भेटू
ज्यांना वाटतं आम्ही फडणवीसांना भेटू नये त्यांना राजकारण कडू करायचे आहे का? राज्यासाठी चांगलं होत असेल, तर सातत्याने उघडपणे भेटत राहू. टीका करणाऱ्यांनी टीका करावी, ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.