पोलिस असल्याचे भासवून आरोपींना पोलिस ठाण्यात मारहाण
ठाणे, ता. ७ (वार्ताहर) : दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी आणलेल्या तीन आरोपींना वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षात पोलिस असल्याचे भासवून अक्षय दत्तात्रय कोल्हे (वय ३६) याने पोलिसांच्या चामडी पट्ट्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. ५) उघडकीस आली. हे प्रकरण माजी नगरसेवकाने उघडकीस आणल्याने पोलिसांनी कोल्हे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी गणेश गुरव व इतर दोन जणांना गुन्हे प्रकटीकरण कक्षात चौकशीकरिता घेऊन आले होते. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करीत असताना गुन्हे प्रकटीकरण कक्षात चौकशी पोलिस उपनिरीक्षक थोरवे यांच्या मदतीसाठी अक्षय कोल्हे राहणार समतानगर याला बोलावले होते. तपास अधिकारी हे गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या बाहेर कामानिमित्त आल्यानंतर अक्षयने या तिन्ही आरोपींना पोलिस असल्याचे भासवून संशयितांना पोलिसांच्या चामडी पट्ट्याने मारहाण सुरू केली. ही बाब तेथे उपस्थित शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची दखल घेत कोल्हेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे तपास अधिकारी थोरवे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.