गेटवे ऑफ इंडिया येथील
ट्रान्सपोर्ट मरीनाला विरोध
प्रिन्सेस डॉक येथे करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः गेटवे ऑफ इंडिया येथील प्रस्तावित ट्रान्सपोर्ट मरीनाला स्थानिकांचा विरोध होत आहे. प्रिन्सेस डॉकला ट्रान्सपोर्ट मरीना करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
नीलकमल बोटीच्या अपघातानंतर गेटवे ऑफ इंडिया येथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे उघड झाले. त्यामुळे ट्रान्सपोर्ट मरीनाची गरज निर्माण झाली असून, नीलकमल अपघातानंतर ट्रान्सपोर्ट मरीनाचा प्रस्ताव जलद गतीने मार्गी लावण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे.
कुलाबावासीयांच्या विरोधानंतर भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे ट्रान्सपोर्ट मरीना गेटवे ऐवजी प्रिन्सेस डॉक, बॅलार्ड पिअर येथे करण्याची मागणी केली आहे. नीलकमल बोटीच्या अपघातानंतर गेटवे ऑफ इंडिया येथे पायाभूत सुविधांचा अभाव दिसून आला. त्यामुळे ट्रान्सपोर्ट मरीनाची गरज असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा अध्यक्ष आणि कुलाब्याचे आमदार राहुल नर्वेकर यांनी ट्रान्सपोर्ट मरीना बनविण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मांडला होता. कुलाबा येथील रहिवाशांनी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून सध्याच्या रहदारीमुळे गेटवे येथील या ट्रान्सपोर्ट मरीनाला विरोध केला आहे. क्लीन हेरिटेज कुलाबा रेसिडेंट असोसिएशनचे यांनी गेटवे ऑफ इंडिया आणि कुलाब्यातील रेडिओ क्लब दरम्यानच्या प्रस्तावित जेट्टीला तीव्र विरोध करणारे पत्र दिले आहे.
गेटवेवर सध्या पर्यटकांच्या रहदारीमुळे रस्ते आणि वाहतूक कोंडी होते. मरीनामुळे प्रतिष्ठित ताज हॉटेलचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना, तसेच नागरिकांना अडसर निर्माण होऊ शकतो. स्ट्रँड मार्ग असोसिएशन, माय ड्रीम कुलाबा, कुलाबा एएलएम आणि ओल्ड कफ परेड असोसिएशननेही गेटवे येथील मरीनाला विरोध केला आहे.
ट्रान्सपोर्ट मरीना म्हणजे काय?
ट्रान्सपोर्ट मरीना म्हणजे सुधारित वाहतूक प्रणाली. मरीना केल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. वाहतूक व्यवस्था सुधारेल, त्याचा पर्यटकांना फायदा होईल.
शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी गेटवेकडे जाणारे रस्ते गर्दीने भरलेले असतात. त्यात तिथे मरीना केल्यास पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. या ठिकाणी गेटवेवरून दिसणारे दृश्य पाहण्यात अडथळे निर्माण होतील. त्यामुळे मरीना इतर ठिकाणी करणे आवश्यक आहे.
बेला शाह,
रहिवासी, कुलाबा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.