जीडीपी वाढ ६.४ टक्क्यांपेक्षा कमी
सरकारी आकडेवारीतील अंदाज
नवी दिल्ली, ता. ७ (पीटीआय) : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर म्हणजे ६.४ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने वर्तवला आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्राची कामगिरी खराब झाल्यामुळे ही वेळ आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
कोविड काळात म्हणजे सन २०२०-२१ नंतर प्रथमच भारताची जीडीपी वाढ एवढी मंद होणार आहे. कोविड काळात देशाचा विकास दर उणे ५.८ टक्के एवढा घसरला होता. २०२१-२२ मध्ये तो ९.७ टक्के, सन २०२२-२३ मध्ये ७ टक्के, तर वर्ष २०२३-२४ मध्ये ८.२ टक्के होता.
या आर्थिक वर्षात जीडीपी ६.६ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात वर्तविला होता. आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तवलेला अंदाज त्याहीपेक्षा कमीच आहे, तर केंद्रीय अर्थमंत्रालयानेदेखील आधी साडेसहा ते सात टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यासाठी आधारभूत मानला जाईल.
जुलै-सप्टेंबर या कालावधीत आर्थिक वाढ गेल्या सात तिमाहींच्या नीचांकी स्तरावर म्हणजे ५.४ टक्के एवढी घसरली होती. एप्रिल-जून या तिमाहीत ती ६.७ टक्के एवढी होती. मागील आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राची वाढ ९.९ टक्के होती. या आर्थिक वर्षात ती ५.३ टक्के एवढी घसरण्याची शक्यता असल्याचे या कडेवारीत म्हटले आहे, तर व्यापार, हॉटेल, प्रवास आणि दूरसंचार या क्षेत्रांचा समावेश असलेले सेवा क्षेत्र मागील वर्षी ६.४ टक्क्यांनी वाढले होते. यावर्षी ते ५.८ टक्के वाढण्याची अपेक्षा आहे, तर मागील वर्षी कृषी क्षेत्र १.४ टक्क्यांनी वाढले होते, ते आता ३.८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.