मुंबई

जागतिक शांततेसाठी भारत-अमेरिकेची भूमिका महत्वाची

विनोद राऊत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई हे जागतिक व्यापार आणि असंख्य कल्पनांचे शहर आहे. भारत-अमेरिकेने गेल्या काही वर्षांत जागतिक शांतता, सुरक्षा, आरोग्य आणि हवामान बदलाबाबत मोठे काम केले आहे. मुंबईने याबाबत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील राजदूत इरिक गार्सेटी यांनी केले. राजदूत म्हणून शेवटच्या मुंबई भेटीनिमित्त हॉटेल ताज येथे झालेल्या छोटेखानी समारंभात गार्सेटी यांनी दोन देशांमधील मैत्री, वाढत्या भागीदारीचा आढावा घेतला.
अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर नियोजित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारीला ४७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यासोबतच जुन्या राजदूतांचा कार्यकाळही संपुष्टात येणार आहे. अमेरिकेत राजदूत म्हणून राजकीय व्यक्तींची नियुक्ती केली जाते. डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य असलेले इरिक गार्सेटी हे लॉस एन्जेलिसचे सर्वात तरुण महापौर म्हणून निवडून आले होते. २०२३मध्ये त्यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली.
अमेरिकेच्या दृष्टीने भारत किती महत्त्वाचा देश आहे, हे सांगताना अमेरिकेने जगातील आपले दुसरे दूतावास १७९१मध्ये कोलकात्यात, तर १९३८ मध्ये मुंबईत अमेरिकन वकिलाती सुरू केल्याचे गार्सेटी यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही एकत्र येऊन अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करीत आहे. जागतिक शांततेच्या दृष्टीने या देशांचे प्रत्येक पाऊल हे जिमी कार्टर यांना श्रद्धांजली ठरेल, असेही गार्सेटी यांनी म्हटले. दोन्ही देशांतील संबंध हे केवळ व्यापार, करारापुरते मर्यादित नसून ते मानवी मूल्यांवर आधारित आहेत. व्यापारासोबत दोन्ही देशांतील लोकांमधील थेट संबंध वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
----
सुरक्षित प्रशांत महासागर
क्वाडच्या माध्यमातून प्रशांत महासागर अधिक सुरक्षित आणि व्यापारासाठी मुक्त करण्यासाठी दोन्ही देश काम करीत आहेत. शक्तिशाली देश योग्य काम करतील यापेक्षा योग्य राष्ट्र ताकदीने काम करतील, यावर आमचा विश्वास आहे. दोन्ही देश संरक्षण व शस्त्र खरेदी, निर्मितीत संयुक्त काम करीत असून, अमेरिकेची संरक्षण क्षेत्रातील निर्यात आता ३२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अमेरिका हा भारतासोबत सर्वाधिक संयुक्त लष्करी कवायती करणारा देश असल्याचे गार्सेटी यांनी सांगितले.
---
कार्टर यांची आठवण
शांतता आणि मानवतेसाठी आयुष्य वेचणारे जिमी कार्टर १९७९ मध्ये मुंबई भेटीवर आले होते. त्यांच्या आई लिलियन कार्टर यांनी मुंबईतील रुग्णालयात कुष्ठरोग्यांसाठी सेवा केली होती. भारताचा दौरा समाप्त होताना त्यांच्या आईने, जिमी यांना विचारले की मी अजून काही तास येथे काम करू शकेल का, अशी आठवण गार्सेटी यांनी जिमी कार्टर यांच्याबाबत सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT