मुंबई

हिरव्या तुरीच्या शेंगांना बहर

CD

वाणगाव, ता. १८ (बातमीदार) : डहाणू परिसरातील शेतकरी भातपिकाच्या जोडीला बांधावर तूर लागवड करणे पसंत करत आहेत. यंदा खरीप हंगामात लागवड केलेल्या हळव्या जातीच्या तुरी कापून खळ्यावर झोडणीदेखील करण्यात आली आहे. गरव्या जातीच्या तुरी या सध्या फुलोरा अवस्थेतून दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत.

भातपिकाची कापणी पूर्ण झाल्यानंतरही रब्बीमध्ये अन्य कडधान्यवर्गीय पिके घेतली जातात. खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या गरव्या जातीच्या तुरी साधारणतः जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये परिपक्व होऊन त्याची खळ्यावर झोडणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न आणि गरव्या जातीच्या बांधावरील तुरीपासून मिळणारे उत्पन्न अशा दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे, असे डहाणू कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

तुरीच्या हिरव्या कोवळ्या शेंगांना बाजारात ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात पोपटी पार्टीचे बेत करण्यात येत आहेत. पोपटीमध्ये तुरीच्या शेंगा टाकून स्वाद घेण्याचा आनंद खवय्ये लुटत आहेत. तुरीच्या शेंगा उकडून खाण्यासाठी ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. भाजी करण्यासाठी हिरव्या कोवळ्या तुरीच्या शेंगांना पसंती मिळत आहे.

बांधावर तूर लागवड फायदेशीर
बदलते हवामान, पावसाची अनियमितता यामुळे खरीप हंगामातील भातपिकात शेतकरी नुकसान सोसत आहे. नुकसानीची कमतरता कमी व्हावी आणि अतिरिक्त उत्पादन आणि उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत असून, त्याचा फायदा झाल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे.

कुपोषणमुक्तीसाठी हातभार
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भाताबरोबर तूर बियाण्यांचे वाटप कृषी विभागामार्फत झाले आहे. परिणामी तूर लागवड क्षेत्र वाढले. रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्रोत असलेल्या कडधान्याचा समावेश झाल्याने आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी बांधावरील तूर लागवड योजनेचा फायदा होईल, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी व्यक्त केले.

उत्पन्न वाढण्यास मदत
आत्मा अंतर्गत यावर्षी एकरी २५० ग्रॅम बियाणे भातशेतीच्या बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आले होते. भातलावणी केलेल्या काही शेतकऱ्यांनी बांधावर तुरीची लागवड केली आहे. तुरीच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.

सध्या तुरीच्या हिरव्या शेंगांचा बहर असून, त्या विकूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. कोवळ्या तुरीच्या शेंगांना अर्ध्या किलोला ५० रुपये भाव मिळतो. तुरीचे पीक बांधावर असल्याने बांधही सुस्थितीत आहेत. उत्पादन हे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मिळत असल्याने रब्बीतील पीक आणि गरवी तुरी असे दुहेरी उत्पन्न मिळण्यास मदत होते.
- समू बुजड, तूर उत्पादक शेतकरी, खूनवडे

वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी, पाण्याची बचत करण्यासाठी, जमिनीचा कस सुधारणे व टिकून ठेवण्यासाठी, शाश्वत शेतीसाठीसुद्धा तूर हे पीक अतिशय उपयुक्त आहे. पिकाच्या मुळांवरील ग्रंथीत रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकाच्या नत्राची गरज बऱ्याचशा प्रमाणात परस्पर भागविली जाते.
- विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर

डहाणू तालुक्यात ६०० एकरवर तुरीची लागवड करण्यात आली. भातखाचरात खेकड्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने, तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तुरीची मुळे खोलवर जात असल्याने खेकड्यांचा आणि पूरस्थितीत बांध फुटण्याचा धोका टळू शकेल.
- किशोरी विशे, कृषी विभाग, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT