वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबईकर नागरिकांची महापालिकेशी संबंधित सर्व कामे सुलभ व सोप्या पद्धतीने विनासायास व्हावीत, याकडे आयुक्त डॉ. कैलास शिंदे विशेष लक्ष देत आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामकाजाला गती देण्यावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने कोपरखैरणे विभाग कार्यालयामध्ये अचानक पालिका आयुक्तांनी भेट दिली. या वेळी उपलब्ध असलेल्या नस्ती, कागदपत्रे यांचे डिजिटलायझेशन करण्याचे सूचित करण्यात आले असून, कार्यालयांतील उपलब्ध अभिलेखाचे पुनर्विलोकन करणे, सरकारी नियमानुसार अ, ब, क, ड कागदपत्रे स्वरूपात वर्गीकरण करणे याबाबत मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सर्व विभाग कार्यालयांत अंतर्गत स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी. त्यासोबतच जुन्या फर्निचरची योग्यरीतीने विल्हेवाट लावावी, असे आयुक्तांनी सूचित केले. कार्यालय परिसराचीही स्वच्छता करावी व नीटनेटकेपणावर भर द्यावा. अभ्यागत कक्षाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. कार्यालयांमध्ये कर्मचारी व नागरिकांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छ प्रसाधनगृह व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांची महापालिकेशी संबंधित करभरणा करणे अथवा इतर कामे सहजपणे व विहित वेळेत व्हावीत, यादृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहावे असे सूचित करीत अधिकाऱ्यांनी नागरिकांना कार्यालयात भेटीची वेळ निश्चित करावी. ती ठळकपणे प्रदर्शित करावी व त्या वेळेत नागरिकांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तत्पर कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.