वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली नोडमध्ये प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. परिमंडळ दोनच्या भरारी पथकाने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त संजय तायडे यांच्या माध्यमातून घणसोली विभागातील दुकानांमध्ये अचानक जाऊन प्लॅस्टिक पिशव्या व एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यामध्ये घणसोलीतील रॉयल फरसाण, दिनेश फरसाण व शिवशक्ती मार्ट या तीन दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे एकूण १५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्यासोबतच ३० किलो प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. प्लॅस्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत असून, नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातून एकल वापर प्लॅस्टिकला हद्दपार करावे. त्याकरिता कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा, असे पालिकने आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.