टिटवाळा, ता. १८ : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाऊन या सामाजिक संस्थेतर्फे टिटवाळा नजीकच्या आदिवासी पाड्याच्या विकासासाठी ‘स्कूल रेथॉन’ स्पर्धा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या मॅरेथॉनचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून पालकांनी लवकरात लवकर पाल्याची नोंदणी करावी आणि हा आरोग्यवर्धक कार्यक्रम उचलून धरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा २ फेब्रुवारीला रेजन्सी अनंतम या निवासी संकुलच्या अंतर्गत रस्त्यावर होणार आहे. अनंतम येथील मैदानात ही मॅरेथॉन समाप्त होईल. स्पर्धेची वेळ सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत असणार आहे.
मॅरेथॉनमध्ये ९ ते १८ वर्षे वयोगटातील शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले व मुली आणि प्रेक्षक सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनचे उद्दिष्ट टिटवाळा नजीकच्या आदिवासी पाड्याच्या विकासासाठी निधी संकलन करणे व समाजात उत्तम आरोग्य संवर्धन करणे या विषयाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. २०२३मध्ये ‘स्कुल रेथॉन’ गंधारे, कल्याण येथे पार पडला होता. त्यातून संकलित निधी वापरून मस्कळ गाव येथील आदिवासी पाड्याला धान्य, कपडे वाटप, सायकल वाटप; तसेच रोटरी स्किल सेंटर कार्य सुरू केले. ही मॅरेथॉन २ किमी, ३ किमी, ५ किमी अशा तीन गटांत आहे. त्याची नोंदणी सुरू झाली आहे. मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांना टी-शर्ट, पदक, नाश्ता, प्रशस्तिपत्रक आणि बॅग असे साहित्य मिळणार आहे. स्पर्धेती विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउनतर्फे देण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.