मुंबई

फायरमन भरतीचा प्रस्ताव धूळखात

CD

फायरमन भरतीचा प्रस्ताव धूळखात
प्रस्तावाबाबत अधिकाऱ्यांचे एकमत होईना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शहरातील अग्निसुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असलेल्या अग्निशमन दलालाच बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात फायरमन आणि वाहनचालकांची पोकळी निर्माण झाली आहे. अशातच भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने १५० फायरमन आणि ९० वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच तयार केला आहे; मात्र या प्रस्तावावर अधिकाऱ्यांचे एकमत होत नसल्याने प्रस्ताव मुख्यालयात धूळ खात पडून असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेबाबत पालिका प्रशासन गंभीर नाही का, असा सवालदेखील उपस्थित होत आहे.

ठाणे शहराचा मागील काही दिवसांपासून झपाट्याने विस्तार होत आहे. अशातच घोडबंदर परिसरासह शहराच्या मध्यवर्ती भागात टोलेजंग इमारती व मोठी गृहसंकुले उभे राहत आहेत. या संकुलांत उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींना फायरचे ना-हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागाकडून घ्यावे लागत असते. असे असताना दुसरीकडे सध्याच्या घडीला अग्निशमन विभागालाच बळ देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ठाणे पालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेला १५०च्या आसपास कर्मचारीवर्ग मागील दोन वर्षांत सेवानिवृत्त झाला आहे. तर दुसरीकडे त्या तुलनेत भरती प्रक्रिया राबविण्यात न आल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण झाली आहे.

अग्निशमन विभागात ३१ सप्टेंबर २०२२ मध्ये आकृतीबंध मंजूर करताना ८३५ पदांना मंजुरी दिली आहे; मात्र प्रत्यक्षात अग्निशमन विभागात सध्या २०९ पदे भरली गेली आहेत, तर ६२६ पदे आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमध्ये मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांसह विभागीय अग्निशमन विभागीय अधिकाऱ्यांची १२ पदे मंजूर आहेत. त्यातील एकच पद भरले गेले असून, ११ पदे आजही रिक्त आहेत. सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची ५६ पदे मंजूर आहेत. यातील केवळ सहा पदे भरली गेली आहेत. तब्बल ५० पदे आजही रिक्त आहेत. फायरमनची आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका असते; मात्र ४५० पदे मंजूर असताना केवळ ९० पदे भरली गेली असून, ३६० पदे रिक्त आहेत. तसेच वाहनचालकांची २२५ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २१ वाहनचालक आहेत. त्यामुळे चालकांची उणीव भरून काढण्यासाठी सध्या अग्निशमन विभागाकडे टीएमटीचे ३३ चालक काम करीत आहेत.

असा होता प्रस्ताव
कायमस्वरूपी पदे भरणे शक्य नसल्याने आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने दोन वर्षांपूर्वी कंत्राटी स्वरूपात अनुभवी फायरमन आणि वाहनचालक घेण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यात १५० फायरमन आणि ९० वाहनचालक घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दोन वर्षांनंतर आजही या प्रस्तावावर एकमत होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील अग्निसुरक्षेबाबत पालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT