मुंबई

ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा

CD

नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ-फेस्कॉम मुंबई व नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २७ जानेवारीपासून या स्पर्धांना सुरुवात होणार आहे. फेस्कॉम अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब टेकाळे यांच्या उपस्थितीत नेरूळ (प.) येथील ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीला एकपात्री नाट्याभिनय, द्विपात्री नाट्याभिवाचन, कथाकथन, वक्तृत्व, समूह नृत्य व चित्रकला स्पर्धा होणार आहेत. २८ जानेवारीला कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर १९ फेब्रुवारीला सायन येथील डी. एस. हायस्कूल येथे संगीत स्पर्धा (गायन) होणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करावा व जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुरेश पोटे व स्पर्धा समितीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष सुरेश पोटे ९३२२४०१९६५ यांच्याशी संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT