मुंबई

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांवर ठाण्यात उपचार

CD

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ठाण्यात उपचार
एमटीएनलच्या जागेवर सीजीएचएसचे वेलनेस सेंटर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : केंद्र सरकाच्या विविध अस्थापनांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ठाण्यात मोफत रुग्णसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराच्या चरई येथील एमटीएनलची जागा सीजीएचएस वेलनेस सेंटरसाठी मंजूर झाली आहे. २५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर या जागेला हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच सुसज्ज आरोग्यसेवा उभारण्यात येणार आहे. त्याचा लाभ ठाण्यातील सुमारे एक लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही त्यांच्यासाठी नववर्षाची गोड भेट मानली जात आहे.

सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन हे गेली अनेक वर्षे सीजीएचएसचे वेलनेस सेंटर ठाण्यात सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना यश मिळत नव्हते. अखेर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत लवकरात लवकर हा प्रस्ताव मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय पातळीवर चक्रे फिरली. एमटीएनएलचे अधिकारी, सीजीएचएस अधिकारी व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तीन महिन्यांपूर्वी चरईतील जागेची पाहणी केली. त्यानंतर सीजीएचएसने याबाबतचा प्रस्ताव एमटीएनएलकडे पाठवला. एमटीएनएलने हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य खात्याकडे पाठविला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत जोरदार हालचाली करून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरवा करून चरई येथील एमटीएनएलचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. एमटीएनएल येथील जागा ही प्रशस्त ३००० चौरस फुटांत आहे. या जागेपोटी एमटीएनएलला केंद्र सरकारकडून खासदार नरेश म्हस्के यांनी वार्षिक भाडेही मंजूर करून घेतले आहे. रेल्वे विभाग सोडून केंद्र सरकारचे सर्व विभाग, कस्टम, आयकर, नेव्ही, बीएसएनएल, एमटीएनएल, एअर इंडिया, पोस्ट आदी सर्व विभाग, तसेच संसद सदस्यांना या आरोग्य केंद्राचा मोफत लाभ घेता येणार आहे. असोसिएशनने अध्यक्ष सुभाष पटवर्धन, सचिव शरद भोळे, उपाध्यक्ष अरुण राऊत, खजिनदार चंद्रकांत कांबळे यांनी संघटनेच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेत आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT