मुंबई

बेलापूर-पेंधर मेट्रो दर दहा मिनिटांनी धावणार

CD

खारघर, ता. १८ (बातमीदार) : बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांत सोमवारपासून (ता. २०) सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. आता दररोज सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असल्यामुळे खारघर, तळोजावासीयांचा प्रवास सुखकर होणार आहे.
तळोजा वसाहतीमधील रहिवासी तसेच खारघर सेक्टर ३० ते ४० परिसरातील नागरिकांना बेलापूर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एनएमएमटी बस अथवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत असे. बस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे भरमसाट भाडे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत असल्यामुळे सिडकोने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मागील वर्षी १७ नोव्हेंबरला नवी मुंबई मेट्रो सुरू केल्यामुळे सीबीडी बेलापूर परिसर, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि सिडकोच्या गृहसंकुलांना या मेट्रो मार्गाद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली. दरम्यान, दर १५ मिनिटांनी मेट्रो धावत असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागत असे तसेच तळोजा वसाहत व खारघर सेक्टर ३० ते ४० परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नोकरी आणि व्यवसायासाठी मुंबई, ठाणे आणि पनवेलकडे जाण्यासाठी रिक्षा अथवा एनएमएमटी बसने खारघर रेल्वे स्थानक गाठून पुढील प्रवास करावा लागत असे. त्यामुळे आता सकाळ आणि संध्याकाळी या सर्वाधिक गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव मेट्रो फेऱ्यांचा लाभ व्हावा, याकरिता या मार्गावर २० जानेवारीपासून मेट्रो फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
----------------
नवे वेळापत्रक
सुधारित वेळापत्रकानुसार बेलापूर आणि पेंधर स्थानकातून सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू होणार आहे. बेलापूर येथून रात्री १० वाजता व पेंधर येथून रात्री ९.४५ वाजता मेट्रोची शेवटची फेरी धावणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी ७.३० ते १० आणि सायंकाळी ५.३० ते ८ वाजता; तर पेंधर येथून सकाळी ७ ते ९.३० आणि सायंकाळी ५ ते ७.३० दरम्यान दर १० मिनिटांनी मेट्रोची फेरी होणार आहे. सर्वाधिक गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेंधर येथून दर १५ मिनिटांनी मेट्रो धावणार असल्याचे सिडकोने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT