मुंबई

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळा

CD

डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान सोहळा
मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : पै फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी मंत्री सामंत यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

डोंबिवलीत पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याचे आयोजन डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे केले आहे. या उपक्रमाला मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मंत्री सामंत यांनी डोंबिवलीतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत सांगितले की, “मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी पुस्तक आदान-प्रदान हा उपक्रम महाराष्ट्रभर पोहोचविणे आवश्यक आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या उपक्रमाला नवा आयाम देता येईल.”

मराठी भाषेच्या भविष्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन देताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे मराठीच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे, तसेच मराठी भाषेला जागतिक स्तरावर प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी शाळांच्या घटत्या पटसंख्येबाबत विचार मांडताना मंत्री सामंत म्हणाले की, खासगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा विकसित केल्यास मराठी शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढू शकते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगा लागल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या मॉडेलचा अवलंब करून राज्यभर मराठी शाळांचा विकास होणे गरजेचे आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT