मुंबई

दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्र

CD

दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी, पुनर्वसन केंद्र
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सुमारे पाच हजार ५०० दिव्यांग व्यक्तींनी नोंद केलेली आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती, परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातून काढलेल्या निविदेला महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी मंजुरी दिली आहे. या कामाचे कार्यादेश ''आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस'' यांना देण्यात आले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण सांगळे वाडी येथे झाले. दिव्यांग नागरिक जे अंधत्व, बुटकेपणा, मतिमंद, स्नायु दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, स्वमग्नता, अध्ययन अक्षमता, थैलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, वाचादोष, बहुविकलांगता, कर्णबधिरता हिमोफिलीया, लोकोमोटर डिसॅबिलीटी इत्यादी व्याधींनी पीडित आहेत, त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आरोग्यसुविधा निःशुल्क पुरविण्यात येणार आहेत.

पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, केडीएमसी सचिव किशोर शेळके, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, समाज विभागाचे उपायुक्त संजय जाधव, प्रशांत गवाणकर, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, नीलेश शिंदे, उपशहरप्रमुख मोहन उगले, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, आधार रिहॅबिलेटेशन सर्व्हिसेसच्या संचालक डॉ. सोनल सिंग, व्यवस्थापक जयंत कदम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

पालिका क्षेत्रातील नागरिकांना मोफत लाभ
दिव्यांग व्यक्तींसाठी पहिल्यांदाच हे फिजिओथेरपी सेंटर कल्याणमध्ये सुरू झाले आहे. खासगी ठिकाणी गर्दी खूप असते आणि पैसेदेखील जास्त असतात. सात हजार स्क्वेअर फूट जागेत हे सेंटर उभारले आहे. या सेंटरचा लाभ केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना मोफत आहे. इतर ठिकाणच्या लोकांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार आहेत. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणचे रुग्णदेखील या ठिकाणी येतील. अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : पुणे-बंगळूर महामार्गावर प्रवास करताय? उंब्रजच्या 'त्या' जीवघेण्या कोंडीतून आता कायमची सुटका, गडकरींकडून 133 कोटींच्या 'सिंगल पिलर' पुलाला मंजुरी!

Nagpur Crime News : कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश; तीन व्यापाऱ्यांना अटक, कसा उघडकीस आला प्रकार?

Women’s Day Finance Planning: महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी टर्म विमा आणि निवृत्ती नियोजन का आवश्यक?

Baba Khan: धाड.. धाड.. धाड.. घरावर बेछूट गोळीबार; घटनेत पोलीसही जखमी, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरसोबत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Stroke Summit: भारतामध्ये मृत्यूचे चौथे मोठे कारण स्ट्रोक! उपचारांसाठी प्रगत क्रिटिकल केअरची गरज; तज्ज्ञांचे समिटमध्ये मत

SCROLL FOR NEXT