मुंबई

‘आरटीई’ प्रवेशासाठी पाच हजार जागा

CD

पालघर, ता. १८ (बातमीदार) : आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील २७२ शाळांनी नोंदणी केली आहे. त्या शाळाअंतर्गत पाच हजार ७२ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली असून, २७ जानेवारीपर्यंत मुदत आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. ‘आरटीई’ अंतर्गत पहिली आणि नर्सरीकरिता प्रवेश दिला जातो. यामध्ये एकूण २७२ शाळांमधून पाच हजार ७२ विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. डहाणूमधील ६३ आणि जव्हारमधील सात अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशांकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. २७ जानेवारीपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याचा अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर एकाच ठिकाणाहून सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता
मोफत प्रवेशाकरिता बालकांचा निवासी पुरावा, तसेच शाळेपर्यंतच्या अंतराचा उल्लेख, बालकाचा जन्माचा दाखला, वडिलांच्या उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, बालकांचे व पालकांचे आधार कार्ड यासह इतरही कागदपत्रांची आवश्यकता आहे. या मुदतीमधे प्रवेश घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या www.zppalghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील शाळांनुसार प्रवेशसंख्या
तालुका शाळा जागा
डहाणू १५ १६४
जव्हार ३ ३७
पालघर ६९ ९१७
तलासरी १२ ११४
वसई १५३ ३,६३७
विक्रमगड ७ ५८
वाडा १३ १४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT