मुंबई

घाटकोपर सेंटरच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश

CD

घाटकोपर सेंटरच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश

मुंबई, ता. १८, (बातमीदार) : अक्षरशिल्प पामा इंडिया या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर सेंटरच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या पामा ग्लोबल आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि तेराव्या पामा इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सानिया सचिन कुलकर्णी हिने ठसा उमटवला. ही स्पर्धा जी हो ची मिन्ह सिटी, व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय अबॅकस आणि मेंटल अर्थमॅटिक स्पर्धेत, सानिया सचिन कुलकर्णी हिला तृतीय क्रमांक मिळाला असून, तिने भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले. या वेळी अक्षरशिल्पचे प्रेसिडेंट आबाजी काळे यांनी तिची निवड केली होती, तर शिल्पा आबाजी काळे यांनी तिला मार्गदर्शन केले होते. यासाठी संचालिका उज्वला नितीन डांगे यांनी सानियाच्या प्रशिक्षणासाठी अथक प्रयत्न केले.
--------------------
यशस्वी विद्यार्थी

पुणे येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत हर्ष कोमल गाजरे (चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन), वरदा अनिल मौर्य, रिया प्रकाश कुंभार, कल्प आनंद कदम, शिवांश चंद्रकांत जगदाळे (चॅम्पियन पारितोषिक) , अद्विका राहुल चव्हाण, आराध्या शंकर टाकळकर, रुपेश शिंदे (प्रथम), वेदांत शशिकांत घंगाळे, रितिका सुधीर पवार, विहान विनायक वरेकर, अंश पवन चौधरी, स्नेहा रवी करजगे, सिया लिलाधर तेली (द्वितीय), मुद्रा महेश चव्हाण, गाथा गुरूदत्त बलकवडे, विहान प्रवीण खाके, युग सुजित सुवर्ण, पुनित मनीष वराडकर, तनिष्का सतीश चव्हाण, तन्मय सतीश चव्हाण, साईश अशोक पुजारी, आर्या प्रशांत गायकर, आरुषी लिलाधर तेली, अनन्या विजय कदम (तृतीय) या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले.

MUM25E75766

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठा गजबजल्या; रेडीमेड गुढींना वाढती मागणी

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT