सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः गिटार वादक, ॲक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके (वय ७८) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे ते नातू होते.
६० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या किरण फाळके यांनी डोंबिवलीतील सहा दशकांची स्थित्यंतरे जवळून अनुभवली होती. अनेक वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम करणारे किरणजी अत्यंत स्वच्छंदी आणि हसतमुख स्वभावाचे होते. ॲक्युपंक्चर शास्त्राचा अनुभव असल्यामुळे गेली ३५ वर्षे गरजूंना मोफत उपचार देत होते. भिवंडीतील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून नुकतीच त्यांची नियुक्ती झाली होती. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. शेवटच्या श्वासापर्यंत विविध क्षेत्रांत कार्यरत होते. डोंबिवली पूर्वेतील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
-------------------------------
गिटार वादनातून मनोरंजन
गाण्यांमधून लोकांचे मनोरंजन करणे, हा त्यांचा छंद होता. त्यांना की-बोर्ड, साऊथ अर्बन, गिटार, हवाईयन गिटार यासारखी विविध वाद्य येत होती. डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दोन ध्वनिमुद्रिकाही तयार केल्या होत्या. इतकंच नव्हे तर दुचाकीवरून डोंबिवली ते कन्याकुमारी आणि पाकिस्तान सीमेपर्यंतचे भारत भ्रमण केले होते. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.