डोंबिवली, ता.१८ ः एका गुन्ह्यातील आरोपी विठ्ठलवाडी पोलिसांच्या गाडीतून पळाल्याची घटना शनिवारी घडली. आधारवाडी कारागृहात घेऊन जात असताना कल्याण पश्चिमेतील वायले चौकात ही घटना घडली.
एका गुन्ह्यात अटक झालेला संजू वाघेरी हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळाला आहे. कल्याण पश्चिमेतील व्हरटेक्स इमारतीजवळील मोठ्या मैदानातील झाडेझुडपांमध्ये तो लपला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांसह स्थानिक खडकपाडा पोलिसांकडून परिसरात उशीरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होते. या घटनेनंतर पोलिस दल सतर्क झाले असून आरोपीला पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.