मुंबई

वसई वाहतूक पोलिसांकडून जनजागृती

CD

वसई, ता. १८ (बातमीदार) : रस्त्यावरून वाहने सुसाट धावत असतात. चालकांकडून अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना जीवदेखील गमवावा लागतो. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी वसई वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. ‘हेल्मेट वापरा, जीव वाचवा अन्यथा यम प्राण घेऊन जाईल’, असा संदेश देण्यात आला.

वसई पश्चिमेतील वाहतूक विभाग कार्यालय ते अंबाडी नाका मार्गापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या वेळी वाहतुकीच्या नियमांची माहिती वाहनचालकांना करून देण्यात आली. याचबरोबर यमाच्या रूपात आलेल्या एका व्यक्तीने हेल्मेट न घालणाऱ्यांना अडवून वाहतूक पोलिस हेल्मेट आणि गुलाब भेट देत होते. हेल्मेट का वापरावे याची माहिती देण्यात आली. या वेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत लांघी, उपनिरीक्षक तानाजी चौगुले यांच्यासह कर्मचारी आदी सहभाग होते.


वाहन चालवताना रस्ता वाहतुकीचे नियम हे प्रत्येक चालकाने पाळले पाहिजेत. वसईत हेल्मेट वापरणे तसेच वाहतुकीच्या कायद्याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या वेळी अनेक जण हे विनाहेल्मेट प्रवास करीत होते. त्यांचे वाहतूक विभागाकडून प्रबोधन करण्यात आले.
- प्रशांत लांघी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT