मुंबई

शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घ्या

CD

शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घ्या
शिक्षक संघटनेची मागणी
भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सध्या बारावी व दहावीच्या बोर्ड परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन व प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये व्यस्त आहेत. अशा कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू केले आहे. हे प्रशिक्षण पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून लवकरच दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी खोटे अपंगत्व दाखवणे, बनावट प्रवेशपत्र तयार करणे किंवा प्रवेशपत्रावर अनधिकृत बदल करणे, प्रश्नपत्रिकांची चोरी, विक्री किंवा प्रसार करणे, परीक्षा काळात जवळ शस्र बाळगणे किंवा धमकावणे, परीक्षा यंत्रणेतील घटकांना लाच देणे किंवा त्यांच्यावर दबाव आणणे, बोर्डाकडून मिळालेले साहित्य नष्ट करणे किंवा चोरून नेणे इत्यादी कृत्ये केल्यास अशा विद्यार्थ्यांवर किंवा त्याला या गैरमार्गासाठी मदत करण्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई बोर्डाने निश्चित केली आहे. या कायद्यामध्ये जो विद्यार्थी गैरमार्गाने किंवा गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहीत असेल, एखादे साहित्य आढळले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. या नियमांची जास्त प्रसिद्धी झाल्याने परीक्षार्थींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी विशेष बाबींचा उल्लेख अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच परीक्षेच्या काळात शिक्षकांवर प्रचंड ताण असतो. अशा काळात शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण घेतल्याने ते प्रभावी ठरणार नाही, उलट औपचारिकता म्हणून या प्रशिक्षणास हजर राहिल्याने हजारो शिक्षकांच्या वेळेचा अपव्यय व लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त असलेले हे प्रशिक्षण पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आयोजित करावे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना तसे निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT