बांधकामांसाठी प्रक्रियायुक्त पाणी वापर बंधनकारक
नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः स्वत:च्या मालकीचे धरण असूनही काही भागांत निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे सतर्क बनलेल्या नवी मुंबई महापालिकेने येत्या उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी आतापासूनच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी काढले आहेत. महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रियायुक्त पाण्याचा बांधकामांसाठी वापर केला जावा, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण सात मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत. ही सगळी मलप्रक्रिया केंद्रे एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित असून, संपूर्ण राज्यात अशाप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारी ही केंद्रे यापूर्वीही नावाजली गेली आहेत. ठाणे खाडीत प्रदूषित पाणी जाऊ नये, यासाठी महापालिकेने मागील २० वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शहरातील प्रमुख उपनगरांमध्ये सात ठिकाणी ही केंद्रे उभी केली आहेत. या केंद्रांमध्ये प्रक्रिया केले जाणारे पाणी लगतच असलेल्या ठाणे-बेलापूर अौद्योगिक पट्ट्यातील कारखान्यांमध्ये देता येईल का, याचाही विचार महापालिका स्तरावर सुरू आहे. असे असताना मार्च ते जून महिन्याचा कालावधी लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी या प्रक्रियायुक्त पाण्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
...................
प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा
मलप्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या अमृत मिशनअंतर्गत नवी मुंबई महापालिकेमार्फत कोपरखैरणे व ऐरोली येथे टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यात आले आहेत. या द्विस्तरीय प्रक्रियाकृत पाण्यावर त्रिस्तरीय प्रक्रिया करून हे पुनर्प्रक्रियायुक्त सांडपाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील, औद्योगिक संस्थांना पिण्याशिवाय इतर वापरासाठी पुरविण्यात येते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सद्य:स्थितीत सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू झालेली असून, इतर खासगी भूखंडांवरील विकासकामेसुद्धा प्रगतिपथावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.