बदलापूरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन
वयाची पासष्टी ओलांडलेल्या ज्येष्ठांचा स्तुत्य उपक्रम
अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळ्या बँकांतून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले सहकारी एकत्र जमतात. वयाच्या सत्तरीनंतरही तरुणांप्रमाणे सहली काढून गप्पा गोष्टी आणि मनोरंजनाद्वारे कलागुणांचे धमाल सादरीकरण करतात. त्यातून मैत्रीच्या घट्ट नात्याची वीण तयार झाली आहे. बँकिंग अनुभव स्पर्धेनिमित्त अनोळखी सहकारी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकत्र आले. त्यांचे अलीकडेच ११ आणि १२ फेब्रुवारीला बदलापूरजवळ एका फार्महाउसमध्ये स्नेहसंमेलन भरले होते.
सकाळी नाश्ता करून रात्री माघी पौर्णिमेच्या चांदण्यात पोपटीचा आस्वाद घेतला. तसेच गाण्याची मैफल आणि गप्पादेखील रंगल्या. बुधवारी दुपारपर्यंत गप्पा, गाणी मौजमजा करताना काही जणांनी बदलापूरजवळील मूळगावच्या खंडोबाचे दर्शन घेतले. त्यानंतर अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिराला भेट देऊन या स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली. ज्योती दामले, माधवी मसुरकर आणि आरती कोचरेकर या मुंबईतील तीन महिला सदस्यांनी संमेलन आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. यामध्ये ग्रुपमधील ६३ सदस्यांपैकी ३२ जण एकत्र आले होते. मिलिंद अभ्यंकर हे औरंगाबादचे असून, राज्याच्या इतर ठिकाणच्या सदस्यांमध्ये अंबरनाथच्या तळवटकर यांचा समावेश आहे. सहभागी सदस्यांना शुक्रवारी एक विषय देऊन त्यावर आधारित स्वहस्ते केलेले लिखाण व्हव्हॉट्सॲपवर पाठवले. संमेलनात जीवनातील आनंद लुटताना समाजभान जपले जाते, ही संमेलनाच्या जमेची बाजू आहे.
सहकाऱ्यांच्या निरनिराळ्या लेखनाच्या माध्यमातून ६५ ते ८१ वयोगटातील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आजही एकत्र येतात. वैचारिक देवाण-घेवाण करतात. केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळखीचे रूपांतर भेटीत व्हावे, या हेतूने ग्रुपचे ॲडमिन मिलिंद अभ्यंकर यांनी सहलीचे आयोजन करण्याचे ठरवले. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.