मुंबई

कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार

CD

थकबाकीसाठी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार
ठाण्यात म्युनिसिपल लेबर युनियनची बैठक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देणी सेवानिवृत्तीच्या वेळी देताना पालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार सर्वसाधारण सभेत म्युनिसिपल लेबर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.
ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा शनिवारी युनियन कार्यालयातील स्व. अण्णा साने सभागृहात पार पडली. या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. यात कामगार नेते, युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी, उपाध्यक्षपदी बिरपाल भाल, सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली. तर माजी नगरसेवक अशोक वैती, पवन कदम, ॲड. रवींद्रन नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे.

युनियनच्या सर्वसाधारण सभेत सातव्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे, त्यांच्या ग्रॅच्युएटी, पीएफची रक्कम सेवानिवृत्तीवेळी मिळण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. परंतु प्रशासनाने टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी या वेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

लग्नानंतर लगेचच रश्मिकाकडे गुड न्यूज! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

SCROLL FOR NEXT