मुंबई

जेएनपीय वसाहत मधील सेंट मेरी स्कूल ने केली आठ पदकांची कमाई

CD

जेएनपीए वसाहतमधील सेंट मेरी शाळेचे सुयश
रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आठ पदकांची कमाई
महेश भोईर
उरण, ता. १५ : रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा रसायनी येथील पिल्लई कॉलेजमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडल्या. यामध्ये उरण तालुक्यातील जेएनपीए वसाहतमधील सेंट मेरी स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी विविध वयोगटात सहा मेडलची कमाई केली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजेश अल्फासो, सुपरवायझर संदेश गावंड, ज्योती नायडू यांनी अभिनंदन केले असून, त्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रसायनी येथील पिल्लई कॉलेजमध्ये १३ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा विविध गटांमध्ये पार पडल्या. यामध्ये १४ वर्षांखालील मुलांमध्ये चैतन्य पाटील याने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक, १० वर्षाखालील मुलींमध्ये गोळाफेकमध्ये सुवर्णपदक साधना सर्वानंद हिला रौप्यपदक, आठ वर्षांखालील स्टँडिंग ब्रॉन्ड जम्प मुलींमध्ये जेसीका तांडेल रौप्यपदक, लिझा कामोठेकर आठ वर्षांखालील मुलीमध्ये स्टँडिंग ब्रॉड जॅम्प कांस्यपदक, १०० मीटर धावणे रियान तांडेल आठ वर्षांखालील मुलांमध्ये कांस्यपदक पदक ५० मीटर धावणे कास्यपदक, १२ वर्षांखालील लांब उडी मुलामध्ये जीत घरत याला रौप्यपदक, तर १० वर्षांखालील मुलांमध्ये गोळाफेकमध्ये हर्षित घरत याल रौप्यपदक मिळाले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर २३ आणि २४ फेब्रुवारी पंढरपूर येथे होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे.
या मुलांना घडविण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक राम चौव्हाण आणि हरीश भोंडकर यांनी अधिक मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT