आमदार राजेश मोरे यांचा अपघात
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : एका कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी (ता. १५) हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी खासदार डॉ. शिंदे यांनी आमदार मोरे यांच्या कामाची स्तुती केली; मात्र ते आज उडी मारताना पडले आणि त्यांचे हाच फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. तसेच आमदार कसे काय पडले, याची चर्चा आता रंगू लागली आहे
डोंबिवलीजवळील मानपाडा येथील तलावाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी आमदार राजेश मोरे अनुपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आधीच आमदार मोरे पडल्याची कुजबुज सुरू होती. या कार्यक्रमावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांची स्तुती करीत त्यांच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात आमदार राजेश मोरे यांची स्तुती करताना म्हटले, की लोकांना राजेश मोरे निवडून येतील की नाही, याबद्दल शंका होती. पण मला माहीत होते की राजेश मोरे निवडून येतील. मोरे यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपण दिला आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्यासाठी कामाला लागले आणि आज एक सामान्य कार्यकर्ता आमदार झाला. ते राजेश मोरे आज लांब उडी घेता घेता खाली पडले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून ते ॲडमिट आहेत, म्हणून येऊ शकले नाहीत. निवडून आल्यापासून २४ तास सकाळी सात वाजल्यापासून आपल्या सगळ्यांना उपलब्ध असलेले आमदार आपल्याला मिळालेले आहेत. या खासदार डॉ. शिंदे यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
असा झाला अपघात...
अंबरनाथमध्ये विविध कामांच्या पाहणीसाठी खासदार डॉ. शिंदे गेले होते. या वेळी आमदार राजेश मोरे आणि अंबरनाथमधील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या पाहणीदरम्यान एक नाला क्रॉस करण्यासाठी आमदार मोरे यांनी उडी मारली. समोर एक खड्डा होता त्यात ते घसरून हातावर पडले. तो खड्डा त्यांना दिला नसावा. त्यामुळे हा अपघात झाला, अशी चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.