मुंबई

नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव देणार

CD

तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावेच होईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती आणि अखिल आगरी समाज परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वाशी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत विमानतळ नामकरण लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींचा गणेश नाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
सभेला माजी मंत्री रवी पाटील, विमानतळ नामकरण सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार योगेश पाटील, दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जे. डी. तांडेल, भूषण पाटील, महेंद्र घरत, दीपक म्हात्रे, राजाराम पाटील, पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, दीपक पाटील यांच्यासह आगरी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
दशरथ पाटील यांनी प्रास्ताविकात विमानतळ नामांतराची मागणी अधिक जोरकसपणे लावून धरण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला असून, अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे गेला आहे. विमानतळ सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करावा, त्याचबरोबर विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या आणि इतर कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी करून मुंबई विमानतळाच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळासाठीदेखील पेरेंट कमिटीची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद डॉ. संजीव नाईक यांना द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची मागणी
दि. बा. पाटील यांच्या साडेबारा टक्के योजनेमुळे भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकले. दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील हे दोन भूमिपुत्रांचे लढाऊ नेते होते. दिबांच्या नावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण झालेच पाहिजे, अशी आग्रही मागणी रवी पाटील यांनी केली, तर विमानतळ नामकरण आंदोलनामध्ये आंदोलकांवर विविध खटले दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्याची मागणी जगदीश गायकवाड यांनी केली.

राज्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाच्या संघर्षामध्ये ज्या आंदोलकांवर विविध गुन्हे नोंद झाले आहेत, ते मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. याशिवाय विमानतळ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या आणि अन्य कामांच्या संधी प्राधान्याने विमानतळ प्रकल्पग्रस्तबाधितांना तसेच स्थानिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- गणेश नाईक, मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT