पॉवर लिफ्टिंगसाठी डोंबिवलीतील दोघांची निवड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : पुण्यात पार पडलेल्या नॅशनल रॉ चॅम्पियनशिपमध्ये डोंबिवलीतील दोन खेळाडूंची जागतिक रॉ पॉवर लिफ्टिंग ओपन एशिया फेडरेशन या स्पर्धेत निवड झाली. डोंबिवलीतील पॉवर हाउस जिमचे समीर जोगळेकर यांची मास्टर-२ गटात, तर विजय हडगे यांची सब ज्युनियर गटात निवड झाली आहे.
मुंबईतील मास्टर महिला गटात प्रतिभा तावडे, वृंदा राणे, निता नावर, अर्चना गोलकर, सरिता कदम, रामदिन नंदकिशोर, सब ज्युनियर व ज्युनियर गटात परी अहिर व मानसी अहिर यांची निवड झाली. तसेच मास्टर पुरुष गटात पार्ल्याचे जितेंद्र अहिर, संभाजी अंकर्लेकर व शंकर ठाकूर, तर साताऱ्याचे प्रमोद पाटील, स्मिता पाटील आणि दर्शन देशमुख यांची निवड केली आहे. सिनियर महिला गटात दया हदीया, तर धुळ्याची कुलश्री कोळी व सोनम कतरी या सर्वांची निवड यूपीएफआयच्या महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी सचिन तापडे, युनायटेड पॉवर लिफ्टिंग फेडरेशनचे पदाधिकारी धर्मेश पटेल, अल्ताफ शेख व सचिन तापडे यांनी केली. युनायटेड पॉवर लिफ्टिंग ही स्पर्धा २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान गुजराथ राज्यातील सुरत येथे खेळविण्यात येणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.