मुंबई

भिवंडीत रुग्णवाहिकेमुळे वाहतूक कोंडी

CD

भिवंडीत रुग्णवाहिकेमुळे वाहतूक कोंडी
भिवंडी (बातमीदार) : अरुंद रस्त्यामुळे शहरातील वाहनचालक आणि नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील रुग्णालयाजवळ रस्त्याच्या मधोमध रुग्णवाहिका उभी केल्याने वाहतूक कोंडीची घटना गैबीनगर भागात शनिवारी (ता. १५) दुपारी गर्दीच्या वेळी घडली. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या वाहतूक कोंडीत स्कूल बसदेखील सापडल्याने याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला. शहरातील गैबीनगरमधील औलिया मशिदीजवळील नोबल रुग्णालयात शनिवारी दुपारी रुग्णवाहिका क्रमांक एमएच ०४/ जेके ९४५४ चा चालक रुग्णाला घेण्यासाठी पोहोचला. तेव्हा रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध उभी केली. त्यानंतर तो रुग्णाला घेण्यासाठी रुग्णालयात गेला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन तिथे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांना बराच काळ समस्यांना तोंड द्यावे लागले. या कोंडीत शाळेची बसदेखील अडकली. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT