झाडांची कत्तल करणाऱ्या विकसकांवर गुन्हा
अंबरनाथ ता. १६ (वार्ताहर) : नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याने विकसकाने दोन झाडांची कत्तल केली होती. पालिकेची कोणतीही परवानगी व सुरक्षेची उपाययोजना नसताना दोन इमारतींच्या मधोमध असणारे झाड तोडल्याने मोठी दुर्घटना घडली होती. यात भारत गॅसचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. त्याचबरोबर बाजूच्या इमारतीची संरक्षण भिंत, दुचाकी आणि चारचाकी गाडीचे नुकसान झाले होते. या प्रकरणात पालिकेने संबंधित विकसकाला नोटीस बजावत पालिकेच्या परवानगीशिवाय झाडे का तोडली? याचा खुलासा सात दिवसांत मागितला होता; मात्र विकसकाने मुदतीनंतरही समाधानकारक उत्तर न दिल्याने पालिकेने तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथमध्ये ३० जानेवारीला दुपारच्यावेळी अंबरनाथच्या कानसई सेक्शन विभागात क्रिस्टल विकसकाने दोन मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार घडला होता. नवीन इमारतीचे बांधकाम करताना झाडांमुळे अडचण निर्माण झाली होती. यामुळे झाडांची जेसीबीच्या सहाय्याने कत्तल करण्यात आली. सुरक्षेची उपाययोजना नसल्यामुळे यामध्ये भारत गॅसचा कर्मचारी मोहमद कुरेशी (उर्फ बाबू भाई) गंभीररित्या जखमी झाला होता. याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र केदारे यांनी जागेची पाहणी करून विकसकांना एक आठवड्याची मुद्दत देत कारणे दाखवा नोटीस बजावली होती; मात्र बिल्डरने समाधानकारक उत्तर न दिल्याने तसेच विकसकाने पालिकेची परवानगी न घेताच परस्पर झाडे तोडल्याचा निष्कर्ष ठेवला आहे. याप्रकरणी अंबरनाथ नगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी जितेंद्र केदारे यांच्या फिर्यादीनुसार विकसक सुशील तलरेजा (वय ४०), सोहन तलरेजा, वीरेंद्र वाधवाणी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.