मुंबई

पेसाअंतर्गत स्थानिक शिक्षकांची भरती?

CD

पालघर, ता. १६ (बातमीदार) : जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या एकूण १०६९ जागा कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरण्यात येणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असलेल्या शिक्षकांची भरती करण्याचे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पालघर जिल्हा परिषदेला दिले आहेत. मात्र, पेसा अंतर्गत शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती करताना स्थानिक बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करावी, अशी मागणी बिगर आदिवासी संघटनेच्या पात्रताधारक शिक्षकांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ३७१ प्राथमिक शाळा आहे. या शाळांमधील शिक्षकांची एकूण सात हजार १०८ पदे मंजूर आहेत. त्यातील पाच हजार २१७ पदे सध्या भरलेली आहेत. पेसा क्षेत्रातील एक हजार ८९१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक शाळांमध्ये फक्त एका शिक्षकावर सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेळ आली आहे. काही शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनामार्फत आंदोलने करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी नियमित स्वरूपात भरण्यास स्थगिती आहे. मात्र, शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय शिक्षण विभागाकडे ही रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी नियमित पाठपुरावा केला होता. त्यानुसार पहिल्या वेळी पेसाअंतर्गत शाळांमध्ये आदिवासी पात्रताधारक ८२२ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली आहे. उर्वरित १०६९ शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने त्वरित भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.

गुणवत्तेनुसार नियुक्ती
नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त उमेदवारांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी पालघर जिल्हा परिषदेला दिले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात पेस क्षेत्रातील १०६९ शिक्षकांची भरती होणार आहे.

प्राधान्यानुसार प्रश्न सुटणार
सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी व कमी शिक्षक असलेल्या शाळा असे प्राधान्यानुसार शिक्षक भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागा स्थानिक पात्रताधारक शिक्षकांची करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT