मुंबई

ठाणे जिल्ह्यात ८९६ बेकायदा इमारती

CD

ठाणे जिल्ह्यात ८९६ बेकायदा इमारती
कल्याण-अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक बेकायदा बांधकामे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : कल्याण-डोंबिवलीमधील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरण गाजत आहे. अशातच जिल्ह्यातील ठाणे, अंबरनाथ, कल्याण तालुक्यात शासकीय भूखंडावर ८९६ बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. यात कल्याण तालुक्यात ३२७ तर अंबरनाथमधील ५५० बांधकामांचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रेरा नोंदणी घोटाळ्यात ६५ बेकायदा बांधकामे उभी राहिल्याची बाब उघडकीस आली आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयाने ही बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे या बेकायदा बांधकामात घर घेतलेल्या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. बेकायदा बांधकामांवरील ही कारवाई स्थगित करण्यात यावी म्हणून यातील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे; मात्र त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच केवळ ६५ नाही तर ठाणे जिल्ह्यात वर्ग दोनच्या ८९६ भूखंडावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याकडे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोईर यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी ही बाब माहिती अधिकारात उघड केली आहे.

ठाणे जिल्ह्यामधील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वाटप केलेल्या शासकीय भूखंडाबाबत झालेल्या शर्तभंगविषयक प्रकरणांबाबतची माहिती भोईर यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शर्तभंग झालेल्या एकूण एक हजार ६८९ सोसायट्यांपैकी ७९३चे शर्तभंग नियमनाकूल केले आहेत. तर ८९६ सोसायट्यांचे शर्तभंग नियमनाकूल करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

६५ बिल्डिंगमध्ये जमीन मालक, विकसक व वास्तुविशारद हे मुख्य दोषी आहेत. केवळ ६५ नाही तर वर्ग दोनच्या जमिनीवर ९००च्या आसपास बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. यात पालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगररचना विभाग अधिकारी, जिल्हा कार्यालय, रजिस्ट्रेशन कार्यालय हे आहेत. याप्रकरणी मी पुणे येथील कार्यालयात तक्रार केली आहे.
- पांडुरंग भोईर, सामाजिक कार्यकर्ते

भूखंडाचे प्रकार
तालुका वाटप शर्तभंग नियमनाकूल शिल्लक
ठाणे ३२ ३२ १३ १९
कल्याण १,५७७ ७८४ ४५७ ३२७
अंबरनाथ १,३१० ८७३ ३२३ ५५०
एकूण २,९१९ १,६८९ ७९३ ८९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, मालक व्ही. के. सिंग CID कार्यालयात हजर

T20 World Cup, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी कोणाला करणार मदत? काय आहे आत्तापर्यंतचा इतिहास, जाणून घ्या

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT