मुंबई

बदलापूर पालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा

CD

बदलापूर पालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा नारा
एकहाती सत्तेचा आमदार कथोरेंचा दावा
ठाणे, ता. १६ : बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत देत भाजपची एकहाती सत्ता आणणार असल्याचा दावा आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती असूनही आपण एकटे लढलो आणि जिंकलो, असा टोला लगावत त्यांनी शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेची आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला असला तरी बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुसफूस कायम आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे विरुद्ध शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी असा सामना रंगला होता. कथोरे यांच्या पराजयासाठी आयत्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सुभाष पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेशासाठी येथील शिंदे गटाचे प्रमुख स्थानिक नेते सक्रिय होतेच, पण त्यांनी महायुती असतानाही विरोधात काम केले होते. याची सल अजूनही आमदार किसन कथोरे यांच्या मनात आहे. माजी लोकप्रतिनिधींना आजी होऊ देणार नाही, हा निश्चय त्यांनी यापूर्वीच बोलून दाखला आहे. आता कथोरे यांनी पुन्हा पालिका निवडणुकांमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करू शकते, असा दावा केला आहे.

वरिष्ठांचा आदेश मान्य
रविवारी (ता. १६) माध्यमांशी बोलताना त्यांनी बदलापूर पालिकेत भाजपच्या सत्तास्थापनेचा पुनरुच्चार केला; मात्र त्याचवेळी वरिष्ठांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल, असेही सांगितले. विधानसभा एकट्यानेच लढलो. सगळे विरोधात असतानाही येथे भाजप किती मजबूत आहे, हे दाखवून दिल्याचे कथोरे या वेळी म्हणाले. जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, पण जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, असे कथोरे म्हणाले. कथोरे यांच्या वक्तव्याने भाजपमधील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र महायुतीतील शिवसेना शिंदे गटासाठी हे आव्हान ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

"त्याचं आधीच ठरलंय.." राकेशच्या घटस्फोटावर बहीण पहिल्यांदाच झाली व्यक्त ; "ते दोघं अजूनही.."

चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यात यूपी पोलीस निष्क्रिय; पण मुंबईच्या पोरीने हिंम्मत दाखवली, स्वतःच चोराच्या घरी पोहोचली अन्...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

SCROLL FOR NEXT