मुंबई

सायबर गुन्हेगारीच्या विरोधात वेलनेस रनचे आयोजन

CD

सायबर गुन्हेगारीच्या विरोधात वेलनेस रनचे आयोजन
खारघर, ता. १६ (बातमीदार) : येथील आयटीएम इन्स्टिट्यूटच्‍या वतीने वाढत्‍या सायबर गुन्हेगारीच्या विरोधात वेलनेस रनचे आयोजन करण्यात आले होते. या वेलनेसचे उद्‌घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी आयटीएम कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जयवंत शेलार, डॉ. लक्ष्मी मोहन, भाजपचे जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, खारघर भाजपचे उपाध्यक्ष अमर उपाध्याय आयटीएमचे महाव्यवस्थापक नीलेश रॉय, गहिनीनाथ नावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयटीएम इन्स्टिट्यूटच्‍या वतीने रविवार (ता. १६) खारघरमधील उत्सव चौकात से नो टू सायबर बुलिंग आणि सायबर हरेशमेन्ट हा विषय घेऊन वेलनेस रनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या साडेपाच किलोमीटर वेलनेस रनमध्ये इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विजेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी खारघर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.
............
उरणमधून तीन नायजेरियन ताब्यात
उरण (वार्ताहर) ः सिडकोने नव्याने विकसित केलेल्या उलवे नोड परिसरात तीन नायजेरियन नागरिकांकडून एक कोटी १० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्‍त करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे न्झेक्वेसु ऑगस्टीन (वय ३५), लॉसन रोमॅनिक (वय ३६) आणि हॅप्पीनेस ईनोस (वय २४) अशी आहेत. त्यांच्याकडून ५९ लाख २४ हजार रुपयांची पांढऱ्या रंगाची पावडर असलेला ११८.४८ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन हा अमली पदार्थ तसेच ५० लाख ४२ हजार किमतीची ब्राऊन रंगाची क्रिस्टल पावडर असलेला १००. ८४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थासोबतच एक हजार रुपयाचा छोटा इलेक्ट्रॉनिक काटा आणि ४३ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
...............
संत सेवालाल महाराज जयंती उत्‍साहात
खारघर (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका हद्दीतील वाशी, सीबीडी, तर पनवेल महापालिका हद्दीतील रोडपाली, कामोठे, कळंबोली आणि तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त वाशी येथील श्री संत सेवालाल महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था, सीबीडी बेलापूर येथील दुर्गा माता नगर येथील संत सेवालाल मित्र मंडळ, कामोठे येथील जय सेवा वसंत बंजारा सामाजिक संस्था, कळंबोली रोडपाली येथील श्री संत सेवालाल सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ आणि तळोजा येथील श्री संत सेवालाल महाराज सेवा भावी सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी आरोग्य शिबिर, रात्री भजन सोहळा, तर शनिवारी मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बंजारा समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
....................
महावाचन स्‍पर्धेत गार्गी महाडिक प्रथम
खारघर (बातमीदार) : महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धेत खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील इयत्ता चौथीतील गार्गी महाडिक हिने उत्कृष्ट वाचन कौशल्याचे प्रदर्शन करत प्राथमिक गटातून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव २०२४ हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम तीन गटांत राबविण्यात आला. महावाचन उत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित केलेल्या इयत्ता तिसरी ते पाचवी गटातील स्पर्धेत गार्गी महाडिक हिने रायगड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रथम आलेल्या गार्गी महाडिक हिला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने गौरविण्यात आले. तिच्या या यशाब‌द्दल शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थीवर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी आणि शिक्षकवृंद यांनी गार्गीच्या या यशाब‌द्दल आनंद व्यक्त करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
..............
मयत प्राण्यांसाठी दफनभूमीची मागणी
खारघर (बातमीदार) : खारघर परिसरात मयत प्राण्यांसाठी दफनभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सीमा टंक यांनी पनवेल पालिका आयुक्तांकडे केली आहे. खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे अनेक वेळा प्राण्यांच्या मृतदेहाची विटंबना होते. हे प्राणिप्रेमींसाठी त्रासदायक ठरत आहे. मानवाप्रमाणे प्राण्यांचे शांततेत अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. प्राण्यांचा मृत्यूनंतर सन्मानाने दफन करण्यासाठी दफनभूमीची आवश्यकता आहे. पनवेल महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग आणि पालिका प्रशासनाने खारघर परिसरात मयत प्राण्यासाठी दफनभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा सनियंत्रण समितीच्या मानद प्राणी कल्याण अधिकारी सीमा टंक यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

Latest Marathi News Live Update : रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत लागली आग

Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद

Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

गॅस बंद करायला विसरली आणि आगीचा भडका उडाला ; जीवानिशी वाचलेली मराठी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT