मुंबई

नेरूळमध्ये शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची स्थापना

CD

नेरूळमध्ये शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीची स्थापना
वाशी, ता. १६ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर एक शिरवणे येथील राजीव गांधी उड्डाणपूल येथील असलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीची स्थापना शिवजयंतीच्या दिवशी होणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नेरूळ राजीव गांधी उड्डाणपुलावरून उतरताच पूर्व बाजूस छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असले तरी कोठेही महाराजांचे अस्तित्व दिसून येत नाही. त्यामुळे या चौकात येणारे नागरिक अनेकदा संभ्रमात पडून शिवाजी महाराज चौक कोठे आहे? हे विचारताना दिसतात. त्‍यामुळे या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. अखेर या शिवप्रेमींचे स्वप्न सत्यात उतरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर या चौकाला शिवशाहीचे रूप देण्यात आले होते, मात्र कित्येक वर्षे महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती मात्र बसविण्यात दिरंगाई होत होती. त्यामुळे शिवप्रेमींकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात होती. महाराजांच्या मूर्तीमुळे नेरूळ विभागाच्या या प्रवेशद्वाराला शोभा येणार आहे. काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणाला, अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आता रंगरंगोटीला वेग आला आहे. संपूर्ण चौकाचे सुशोभीकरणदेखील करण्यात आले आहे. अनेक वर्षे धूळखात पडलेल्या मावळ्यांना सुंदर रूप प्राप्त झाले आहे, तर चौकात ठेवलेल्या शिवकालीन तोफांनी कात टाकली आहे. चौकाच्या घुमटालादेखील स्वरूप देण्यात आले असून, त्याभोवती मातीचे मावळे उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या हातात भाले तसेच शिवकालीन शस्त्रे दिलेली आहेत. शिवजयंतीच्या दिवशी येथे सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
.........
चौकट
नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीच्या दिवशी महाराजांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा पालिकेचा मानस आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stroke Summit: भारतामध्ये मृत्यूचे चौथे मोठे कारण स्ट्रोक! उपचारांसाठी प्रगत क्रिटिकल केअरची गरज; तज्ज्ञांचे समिटमध्ये मत

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

SCROLL FOR NEXT