वीटभट्टीवरील महिलेवर बलात्कार
घटनेनंतर अपघातात पीडितेच्या मुलीचा मृत्यू
मनोर, ता. १६ (बातमीदार) : वीटभट्टीवर काम करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेवर तेथीलच एका कामगाराने बलात्कार केल्याची घटना नुकतीच वाडा तालुक्यातील लोहपे गावात घडली. दरम्यान, बलात्काराच्या घटनेनंतर विटांचा ट्रॅक्टर माघारी आल्याने पीडित महिला जखमी झाली, तर तिच्या आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी सखारामविरोधात शुक्रवारी (ता. १६) वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पती आणि अन्य कामगारांसह विटा घेऊन बंदरपाड्याला गेले होते. वाटेत एका चढणीवर ट्रॅक्टर पुढे जात नसल्याने त्यातील निम्म्या विटा खाली उतरविण्यात आल्या. त्यानंतर पीडितेचा पती आणि अन्य तिघे जण दारू पिण्यास गेले. त्यावेळी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरड केल्यानंतर आरोपी पळून गेला. थोड्या वेळाने पीडितेचा पती व अन्य तिघे दारू पिऊन परतल्यावर ट्रॅक्टर पुढे नेण्याऐवजी मागे आल्याने त्याखाली चिरडून पीडितेच्या मुलीचा मृत्यू झाला, तर पीडिता जखमी झाली. परंतु नातेवाइकांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार वाडा पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला. त्या अहवालावरून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
----
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
घटनेनंतर वीटभट्टी मालक पीडिता आणि तिच्या जखमी मुलीला घेऊन दवाखान्यात घेऊन गेला. त्या वेळी वीटभट्टी मालकाने हा अपघात ट्रॅॅक्टरमुळे नव्हे, तर टेम्पोच्या धडकेने झाल्याचे सांगण्यास पीडितेस सांगितले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता, तिला मृत घोषित करण्यात आले. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याने स्पष्ट झाले. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.