‘मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा’
आरपीएफ जवानाची मुजोरी; हिंदीत बोलण्याचा आग्रह
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : मला मराठी येत नाही, जा माझी तक्रार करा!, अशी मुजोरीची भाषा आरपीएफ जवानाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सचिन कदम यांच्याशी बोलताना वापरल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवर घडला आहे.
मराठा सेक्शनमध्ये राहणाऱ्या एकाचा रेल्वे तिकिटाच्या बुकिंगवरून गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच सचिन कदम यांनी तिथे धाव घेतली; या वेळी एका आरपीएफ जवानाने हिंदीत बोलण्यास सुरुवात केली; त्यावरून आपण मराठीत बोला, असे कदम यांनी या जवानाला सांगितले. त्यावर मला मराठी येत नाही, असे त्याने कदम यांना म्हटले, त्यावर याबाबत मी ‘डीआरएम’कडे तक्रार करतो, असे कदम यांनी सुनावले, यावर जा माझी तक्रार करा, अशी मुजोरीची भाषा या आरपीएफ जवानाने वापरली. या वेळी मध्यस्थीसाठी आलेल्या एका आरपीएफच्या मराठी अधिकाऱ्यानेही ‘त्याला मराठी येत नाही, पण तुम्हाला सुद्धा हिंदी येत नाही का? तुम्ही हिंदीत बोला’, असा सल्ला कदम यांनाच दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच मराठी भाषा वापरण्याबाबतचे परिपत्रक काढले असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे कदम यांनी सांगितले, त्यावर ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला, असा संतापजनक उलट सवाल या मराठी आरपीएफ अधिकाऱ्याने केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला असून, याप्रकरणी आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सचिन कदम यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.