मुंबई

सुभेदारवाडा कट्ट्यावर प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला

CD

देशात पायाभूत सोयीसुविधांचे जाळे विस्तारले : मंगेश सोमण
प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : केंद्र सरकारने मागील चार-पाच वर्षांत भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला होता. त्यामुळे देशात सगळीकडे पायाभूत सोयीसुविधांचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात वेगाने पसरत आहे. त्यामुळे आताच्या भांडवली खर्चात थोडा फरक दिसत आहे. लोकांच्या क्रयशक्तीला बळ देऊन त्यांचा अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा सरकारचा मानस असल्याचे मत अर्थतज्ञ मंगेश सोमण यांनी येथे व्यक्त केले.

कल्याण येथील सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शनिवारी (ता. १५) सुभेदारवाडा शाळेत केले आहे. शनिवारी अर्थतज्ज्ञ मंगेश सोमण यांचे केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले गेले. या व्याख्यानमालेसाठी विशेष अतिथी म्हणून वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील उपस्थित होते. या वेळी पाटील आणि केळकर यांनी प्रा. रामभाऊ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रत्यक्ष कर हा जरी एक ते दीड कोटी लोक भरत असले, तरी उर्वरित जनता जेव्हा काहीही खरेदी करते, तेव्हा जीएसटीच्या माध्यमातून कर भरत असते. केंद्र सरकार ज्या काही योजना राबवत आहे. त्यामागचा त्यांचा साधारण खर्च दोन लाख कोटींचा आहे. त्याचबरोबर अन्य योजना एकत्रित केल्या, तर जवळपास साडेपाच लाख कोटी रुपये हे एकप्रकारचे सरकार लोकांना देत असलेले पैसे असतात, असे सोमण म्हणाले.

जनतेशी संवाद साधावा
कल्याणमध्ये सुभेदार कट्टा रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी वनमंत्री गणेश नाईक आले होते. या वेळी त्यांनी ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवला जाणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. एकनाथ शिंदे, अजित दादा यांनीदेखील पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जनतेशी संवाद साधावा जेणेकरून जनतेला आपली दुःख मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: भंडाऱ्यात दुहेरी अपघात; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT